जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मोहाडी येथील माहेर असलेल्या विवाहितेला व्यवसाय करण्यासाठी माहेरुन ५० हजार रुपये आणावेत या कारणावरुन तिचा छळ करणाऱ्या पतीसह चार जणांविरोधात शुक्रवार, ३ सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील मोहाडी येथील आरती गजानन राठोड (वय २४) यांचा पाचोरा येथील गजानन राठोड यांच्याशी विवाह झाला आहे. लग्नानंतर काही दिवस गेल्यानंतर आरती हिने तिच्या माहेरुन व्यवसाय करण्यासाठी ५० हजार रुपये आणावेत, अशी पतीसह सासरच्यांनी मागणी केली. याच कारणावरुन आरती हिचा वेळावेळी शारिरीक तसेच मानसिक छळ करण्यात आला. अखेर या छळाला कंटाळून आरती राठोड ह्या माहेरी निघून आल्या व शुक्रवारी त्यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन आरती हिचे पती गजानन वसंत राठोड, अजय प्रकाश राठोड, प्रकाश ताराचंद राठोड, सगुनाबाई प्रकाश राठोड सर्व रा. पाचोरा या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक समाधन टहाकळे हे करीत आहेत.