मोहाडी गावातून तरुणाची दुचाकी चोरट्यांनी लांबविली

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील मोहाडी गावातील एका तरुणाची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात मंगळवार ६ जून रोजी रात्री ८ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, चेतन संजय सोनवणे (वय-२७) रा. मोहाडी ता.जि. जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सध्याचे तो शिक्षण घेत आहे. त्याच्या घरासमोर त्याने  १९ मे रात्री १० ते २० मे सकाळी ६ वाजेच्या सुमारास त्याची दुचाकी घरासमोर लावलेली असताना अज्ञात चोरट्याने चोरून नेली. त्यानंतर त्याने परिसरात दुचाकीचा शोध घेतला. परंतु दुचाकी कुठेही मिळून आले नाही. अखेर मंगळवार ६ जून रोजी रात्री ८ वाजता तरुणाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर पाटील करीत आहे.

Protected Content