यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील मोहराळा रस्त्यावर भरधाव ट्रक्टरच्या धडकेत वाहनाचे नुकसान केल्याची घटना घडली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोमीन वसीम शेख सलीम (वय-२५) रा. बाबा नगर, यावल ता.जि.जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. वाहन चालक असून खाजगी वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करतो. रविवार २४ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास तो आपले वाहन घेऊन मोहराळा-सावखेडा रस्त्यावरील जामुनझीरा चौकाजवळून जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टर चालक समाधान आनंदा पाटील रा.दहिगाव ता. यावल यांनी येऊन मोमीन शेख यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.
यात वाहनाचे नुकसान झाले आहे. याबाबत मोमीन वसीम शेख यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून समाधान पाटील रा. दहिगाव ता. यावल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.