यावल, प्रतिनिधी । तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाच्या २१ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात कोरोनाबाबत जनजागृती, वृक्षरोपण, होमिओपॅथिक गोळ्या व इतर उपक्रमांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नागरीकांमध्ये विविध गावामध्ये जनजागृती करण्यात आली. रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या औषधींचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील मोहराळा या गावातील ग्राम पंचायत परिसरातील पाण्याच्या टाकी जवळ वृक्षारोपण करण्यात येवुन या ठिकाणी विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमांना यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व राष्ट्रवादीचे जेष्ठ सदस्य दिनकर सिताराम पाटील , राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष अॅड . देवकांत पाटील , राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विजय प्रेमचंद पाटील ,नाना बोदडे , अजय पाटील, नरेन्द्र पाटील , कामराज घारू, निवृत्ती धांडे ,अरूण लोखंडे अय्युब खान आदीनी या कार्यक्रमांना यशस्वीतेसाठी कामकाज पहिले.