Home Cities चाळीसगाव मोरसिंगभाई मित्र मंडळातर्फे भव्य नेत्र तपासणी शिबिर

मोरसिंगभाई मित्र मंडळातर्फे भव्य नेत्र तपासणी शिबिर


चाळीसगाव, प्रतिनिधी | मोरसिंगभाई मित्र मंडळ यांच्या अथक परिश्रमातून तालुक्यातील लोंजे येथे भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन आज करण्यात आले. यावेळी तीनशे जणांनी नेत्र तपासणी करून घेतली.

मोरसिंगभाई मित्र मंडळ यांच्या वतीने व मुंदडा नेत्र रुग्णालय (औरंगाबाद) यांच्या सहकार्याने भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन तालुक्यातील लोंजे येथे आज करण्यात आले. सदर शिबिर हे जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित करण्यात आले. यावेळी एकूण ३०० जणांनी कम्प्युटर द्वारे नेत्र तपासणी करून घेतली. त्यात प्रथम तपासणी विमलबाई ओंकार चव्हाण यांनी केली. दरम्यान २० जणांचे मोफत ऑपरेशन मुंदडा नेत्र रुग्णालय हे करणार आहेत. तत्पूर्वी १७३ जणांना स्वखर्चाने चष्मा वाटप करणार असल्याचे भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंगभाई राठोड यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्युजशी बोलताना सांगितले. याप्रसंगी केतन पवार, योगेश बादले, अंब्बादास राठोड व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


Protected Content

Play sound