जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील तीघ्रे शिवारातील शेतात असलेल्या मोबाईल टॉवरच्या जनरेटरमधून 100 लिटर डिझेलची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार, 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव तालुक्यातील तीघ्रे शिवारात सुरेश डालू काळे यांच्या शेतात जीवो कंपनीचा मोबाईल टॉवर असून प्रताप टेक्नो क्रफ्ट या कंपनीचे काम सुरू आहे. याठिकाणी असलेल्या मोबाईल टॉवरच्या जनरेटमधून कुलूप तोडून 80 हजार रुपयांचे 100 लिटर डिझेल चोरून नेल्याची घटना 7 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता समोर आली. दिवसभर या परिसरात डिझेल बाबत माहिती घेतली असता, काहीही तपास लागला नाही अथवा डिझेल मिळून आले नाही. अखेर बुधवारी कंपनीचे कर्मचारी सचिन विश्वनाथ सूर्यवंशी यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रवींद्र तायडे हे करीत आहेत.