जळगाव प्रतिनिधी । खिश्यात काहीतरी असल्याचे सांगून हातातील मोबाईल दुचाकीवरील दोघांनी २१ फेब्रुवारी रोजी लांबविला होता. यातील दोघांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली असून यातील एक संशयित अल्पवयीन आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, प्रदीप उत्तम चौव्हाण (वय-२५) रा. सुप्रिम कॉलनी हो २१ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री ८ वाजता कंपनीतून घरी जात होता. रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास एमआयडीसी परीसरातील गुरांच्या बाजारासमोरून जात असतांना मागून दुचाकीवर तोंडाला मास्क बांधलेले दोन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी तुझ्या खिश्यात काहीतरी असल्याचे सांगितले. त्यांनी हातातील विवो कंपनीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून पळ काढला होता. असाच प्रकार पुढे काही अंतरावर दुसाऱ्या व्यक्तीसोबत घडला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपी आकाश उर्फ नाकतोडा संजय मराठे (वय-२२) रा.चौगुले कांचननगर शनिपेठ आणि एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान पोलीसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली असून दोन्ही मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. दोघांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन मुलास बालसुधार गृहात पाठविण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, योगेश बारी, इम्रान सय्यद, सचिन पाटील, गोविंदा पाटील यांनी केली.