नवी दिल्ली वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डरपोक आहेत. ते चीनसमोर झुकले असून त्यांनी आपली पवित्र भूमि चीनला सोपविली असल्याचा गंभीर आरोप आज राहूल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. भारतचीन सीमावादावरून केंद्र सरकारला टार्गेट करत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक आहेत, त्यांनी देशाची पवित्र जमीन चीनला सोपवली असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, एप्रिलपूर्वी परिस्थिती सर्वसामान्य होईल असं सांगितलं जात होतं, परंतु आता संरक्षण मंत्र्यानी विधान केले आहे. भारताची जमीन फिंगर ४ पर्यंत होती, पण सरकारने आता फिंगर ३ वर सहमती का दिली? पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी भारताची जमीन चीनला का दिली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्याचसोबत राहुल गांधींनी भारताच्या पंतप्रधानांनी देशाच्या पवित्र जमिनीचा तुकडा चीनला सोपवला आहे. चीनसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुडघे टेकले आहेत. चीनचे सैन्य पँगोंग, देपसांग याठिकाणी उपस्थित आहेत, आपल्या सैन्यांनी जोखीम घेतली आणि चीनशी मुकाबला केला. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला आपली जमीन दिली. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक आहेत आणि देशाच्या सैन्याचा विश्वासघात करत आहेत असं दिसून येते असा घणाघात राहुल गांधींनी केंद्र सरकारवर केला.