नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पीएम सिक्युरिटीमध्ये तैनात दिल्ली पोलिसांच्या ब्लॅक कॅट कमांडोच्या हत्या प्रकरणात दिल्ली आणि यूपी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी ठार झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
खरंतर, पोलिसांकडून मारेकऱ्याला शरण जाण्याचा इशारा देण्यात आला होता, पण त्याने उलट पोलीस पथकावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी केलेल्या तुफान गोळीबारात मारेकरी गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पोलीस चकमकीत ठार झालेल्या दिल्ली पोलीस कमांडोच्या हत्याराचं नाव जावेद असं असल्याचं सांगण्यात येत आहे. बुधवारी झालेल्या चकमकीत जावेद ठार झाल्याची अधिकृत माहिती दिल्ली पोलीस स्पेशल सेलच्या डीसीपी प्रमोद कुमार सिंह कुशवाहा यांनी दिली आहे. डीसीपी कुशवाहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी उत्तर प्रदेशच्या ठाना क्षेत्रात चकमकीत झाली. यामध्ये पीएम सुरक्षेतील ब्लॅक कॅट कमांडोचा मोरेकरी जावेद याची हत्या झाली आहे.
देशाचे सगळ्यात खतरनाक कमांडो म्हणजे ब्लॅक कॅट कमांडो. यांना एनएसजी कमांडो असंही म्हणतात. देशात वारंवार होत असलेल्या दहशतवादी कारवायांना चोख प्रत्यूत्तर देण्यासाठी १६ ऑक्टोबर १९८४ रोजी एनएसजीची स्थापना करण्यात आली होती. एनएसजीचा मूळ मंत्र म्हणजे ‘सर्वत्र उत्तम संरक्षण’. कमांडोज एनएसजीला ‘नेव्हर से गिव्हअप’ असंही म्हणतात. खरंतर, ब्लॅक कॅट कमांडो होणं सोपं काम नाही.
काळ्या वर्दी आणि मांजरीसारख्या चपळामुळे त्यांना ब्लॅक कॅट असं म्हणतात. ब्लॅक कॅट कमांडो होण्यासाठी सैन्य, पॅरा मिलिटरी किंवा पोलिसात असणं आवश्यक आहे. सैन्यातून ३ वर्षे आणि पॅरा मिलिटरीकडून ५ वर्षे कमांडो प्रशिक्षणासाठी येत असतात.
यासाठी फिजिकल ट्रेनिंग, पॉलिमीट्रिक जम्प, झिग झॅग रन, सिट अप्स, लॉग एक्सरसाइज, ६० मीटरची स्प्रिंग रन, १०० मीटरची स्प्रिंग रन, मंकी क्रॉल, इनक्लाइंड पुश अप्स, शटल रन, बॅटल असॉल्ट ऑब्स्टेकल कोर्स, डब्ल्यू वॉल, टारजन स्विंग, कमांडो हँडवॉक, टायगर जंप अशा अनेक प्रकारच्या परीक्षा द्यावा लागतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी दररोज एक कोटी ६२ लाख रुपये खर्च केले जातात अशी माहिती देण्यात आली होती. जी किशन रेड्डी यांनी लोकसभेत यासंबंधी माहिती दिली होती. पंतप्रधानांचं संरक्षणासाठी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची नेमणूक करण्यात आली आहे. एक हजाराहून अधिक कमांडो विविध मंडळांतर्गत तैनात केले जातात. म्हणजेच, भारताच्या पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था जगातील कोणत्याही इतर देशाच्या राज्यप्रमुखांची सुरक्षा व्यवस्थे इतकी जोरदार आहे.