मोंढाळे पिंप्री येथील बंधाऱ्याचे जलपुजन उत्साहात

पारोळा प्रतिनिधी| बळीराजाच्या जीवनात समृध्दी आणावयाची असेल तर त्याला पुरेशी सिंचनाची सोय उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे. असे प्रतिपादन खा. उन्मेष पाटील यांनी मोंढाळे पिंप्री येथील बोरी नदीवरील बंधाऱ्याचे जलपुजनाप्रसंगी आज व्यक्त केले आहे.

 

खा. उन्मेश पाटील यांच्या दूरदृष्टी व नियोजनातून साकारलेला तालुक्यातील बोरी नदीवरील मोंढाळे पिंप्री येथील बंधाऱ्याचे जलपुजन त्यांच्या उपस्थितीत आज उत्साहात संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी मार्केट सभापती बाळासाहेब भास्करराव पाटील तर प्रमुख अतिथी पंचायत समितीच्या सदस्या सुजाताताई पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार, माजी सभापती डॉ. सुभाष पाटील, मोंढाळे सरपंच बळवंतराव बाविस्कर, पिंप्री चे सरपंच जोस्त्ना पगारे, बोळे सरपंच रावसाहेब गिरासे, डॉ. मनीष पाटील, ग्रा. पं सदस्य प्रताप पाटील, मा.सरपंच लक्ष्मण पाटील, मनोहर पाटील, राजेंद्र पाटील, संभाजी पाटील, पिंपरी माजी सरपंच गंभीर आबा पाटील, संकेत पाटील, छोटू पाटील, राजू पाटील.मल्हार कुंभार, किरण पाटील, विवेक पाटील, दीपक भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रास्तविक सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी केले. गावकऱ्यांच्या वतीने खासदार उन्मेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान जल है तो जीवन है, जल है तो कल है पाणी हे परिसराच्या विकासासाठी मोठी मोलाची कामगिरी बजावेल असे खा. उन्मेष पाटील यांनी सांगितले. सदर बंधाऱ्यांसाठी आपल्याला हायकोर्ट ते सुप्रीम कोर्ट पर्यंत संघर्ष करावा लागला. या संघर्षासाठी व पाठपुराव्यासाठी खासदारांनी अनिल पाटील यांचे कौतुक केले. सदर कामे वेळेवर व उत्कृष्टरित्या पूर्ण करून दिल्याबद्दल देखील त्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले .यावेळी केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ई श्रमिक कार्डचे खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. सुभाष पाटील यांनी खा. उन्मेश पाटील यांचे गावकऱ्यांच्या वतीने आभार मानले. नगराध्यक्ष करणदादा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ते म्हणाले की वर्षानुवर्षे तालुक्यातील समस्या जैसे थे तशाच आहेत. स्वर्गिय माजी आमदार भास्करराव आप्पा पाटील यांच्या जलसिंचनाच्या दृष्टीला पुढे नेण्यासाठी खासदार उन्मेश पाटील यांच्या माध्यमातुन आज हा बंधारा बांधण्यात आला आहे. बंधाऱ्यांच्या निर्मितीने हा परीसर अधिक सुजलाम सुफलाम होईल. गावाच्या चौफेर विकासाला चालना मिळणार आहे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन व आभार नगरसेवक पि.जी.पाटील यांनी व्यक्त केले.

Protected Content