मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात मॉल सुरू झाले आहेत. इतर गोष्टी सुरू करण्यात आल्या आहेत. मग मंदिरं का उघडल्या जात नाही?, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आहे.
त्र्यंबकेश्वरमधील १० पुजाऱ्यांनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे १५ मिनिटे ही बैठक चालली. यावेळी राज ठाकरे यांनी मंदिरं सुरू करण्यावर सकारात्मकता दाखवली. तसेच मंदिरं खुली झाली पाहिजेत. मॉल सुरू होतात, मग मंदिरं का सुरू होत नाहीत, असा प्रश्न देखील उपस्थित केला. परंतू शासकीय नियमांचे पालन करूनच मंदिरं खुली व्हावीत, पण मंदिरं सुरू केल्यानंतर भाविकांची झुंबड उडाल्यास तुम्ही काय कराल? भाविकांची गर्दी कशी रोखाल? कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून गर्दीवर कसे नियंत्रण आणाल? असे काही प्रश्नही त्यांनी उपस्थित केल्याचे कळते. तसेच मंदिरं सुरू केल्यानंतर इतर धर्मिय नियम पाळतील काय?, अशी शंकाही राज यांनी उपस्थित केल्याचे कळते.