मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मेहून येथील सरपंच पदाच्या निवडणुकीत कोमल तुषार पाटील यांनी ४ मते घेवून घवघवीत यश संपादन केले. तर विरोधी उमेदवाराला केवळ २ मतांवर समाधान मानावे लागले. मुक्ताईनगर तालुक्यातील मेहुणे येथील रिक्त असलेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला धोबीपछाड देत आमदार चंद्रकांत पाटील यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील समर्थक उमेदवाराने विजय संपादन केल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी नवनिर्वाचित सरपंच सौ कोमल तुषार पाटील यांचा सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, कृषी विभाग आत्म्या समितीचे अध्यक्ष महेंद्र मोंढाळे, राजू तळेले, मेहुण ग्रामपंचायत सदस्य रवींद्र सुरळके, राजकुमार लक्ष्मण रजाने आदींसह चांगदेवचे माजी सरपंच पंकज कोळी, गौरव पाटील, गंभीर पाटील, युवराज इंगळे, रमेश सुरळके, गणेश सूर्यवंशी, संतोष ढीवर, प्रणव पाटील , संदीप पाटील , दिलीप पाटील आदींची उपस्थिती होती.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी किशोर तायडे तसेच तलाठी धीरज पाटील ग्रामसेवक तबारक तडवी यांनी काम काज पाहिले तर पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.