Home Cities जळगाव मेहरूण येथे संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने स्वच्छता अभियान

मेहरूण येथे संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने स्वच्छता अभियान

0
38

sent gadgebaba maharaj1

जळगाव, प्रतिनिधी । आज संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने मेहरूणमधील स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब चौक येथे स्वच्छता अभियान राबवून आदरांजली वाहण्यात आली.

परिसरात झाडू मारून आणि किर्तनाने मन साफ करणारे, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता यांनी बुरसटलेल्या समाजाला किर्तनासारख्या माध्यमाने जागरूक करणारे संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्ताने मेहरूणमधील स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब चौक येथे संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस विरोधीपक्षनेते सुनिल महाजन व नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले . याप्रसंगी गजानन वंजारी, सागर तायडे, गणेश वाघ, भूषण सोनवणे, दिपक धांडे, दिपक नाईक, सागर लाड, भरत आंधळे, गोटू पाटील, गोविंदा सांगळे, पंकज तायडे, गजानन पाटील, विशाल वंजारी, दामोदर पाटील, विजू पाटील, नितीन पाटील, खन्ना वंजारी, पंकज पाटील, विशाल सानप, तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी संत गाडगेबाबा यांच्या कार्याची माहीती दिली.


Protected Content

Play sound