जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जावी या हेतूने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे विविध फळांपासून ‘सीड बॉल’ तयार करण्याचा उपक्रम राबविला गेला. सुमारे ५०० च्यावर तयार केलेले सीड बॉल डोंगराळ भागात टाकले जाणार आहेत.
विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारच्या बिया एकत्रित करून त्यांचे मातीचे चेंडू बनविले. शाळेतील विद्यार्थी या उपक्रमात मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते. या उपक्रमात शाळेच्या २०० विद्यार्थ्यांनी जवळपास ५०० सीड बॉल तयार केली. त्याची पेरणी पाऊस पडताच हे सीडबॉल डोंगर भागात पेरले जाणार आहेत. अशी माहिती शाळेचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाईक यांनी दिली.
विद्यार्थ्यांमार्फत शाळेत वेगवेगळ्या बिया संकलित करण्यात आल्या. यामध्ये चिंच, आंबा, नीम, जांभूळ, सुबाभूळ आदी बियांचा विशेष करून समावेश आहे. विद्यार्थ्यासमवेत मुख्याध्यापिका शितल कोळी, उज्वला नन्नवरे, साधना शिरसाट, रूपाली आव्हाड, दिनेश पाटील, नयना अडकमोल, साक्षी जोगी, दिव्या पाटील यांची उपस्थिती होती.