मेहरूण परिसरात ढापा तुटल्याने कार गटारीत अडकल्याने कारचे मोठे नुकसान (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरूण येथील जाकीर हुसेन कॉलनीत बाहेरगावाहून आलेली कार गटारीचा ढापा तुटल्याने कार अडकली. यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. महापालिकेच्या कामावंर प्रश्नचिन्ह उपस्थित करून परिसरातील नागरीकांनी संताप व्यक्त केला. यावेळी नगरसेवक पती हाजी युसूफ यांनी आठ दिवसात गटारीवरील ढापा टाकून देण्याचे आश्वासन दिले आहे.

 

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मेहरूण परिसरात असलेल्या डॉ. जाकीर हुसेन कॉलनीत राहणारे डॉ. अबीद यांच्याकडे त्यांचे नातेवाईक भेटण्यासाठी शनिवारी २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास खासगी कारने आले होते. कारने येत असतांना मेहरूण परिसरातील इकरा कॉलेज जवळ असलेल्या चौकात गटारीवरील तुटलेल्या ढाप्यावरून कार जाताच कार अडकली. त्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान गेल्या एक वर्षांपासून स्थानिक नगरसेवक यांच्याकडे तक्रारी करूनही नगरसेवक ढापा दुरूस्तीचे कामाकडे दुर्लक्ष करत आहे. आतापर्यंत ५ ते ६ कार याच पध्दतीने अडकेलेल्या आहे. आजच्या अपघातमुळे कारचे नुकसान झाले असून परिसरातील रहिवाश्यांनी एकच संताप केला होता. या वार्डातील नगरसेवक पती हाजी युसूफ यांनी घटनास्थळी भेट दिली त्यावेळी स्थानिक रहिवाश्यांनी ढापा बसविण्याची मागणी केली आहे. यावर येत्या आठ दिवसात ढापा दुरूस्तीचे काम करून देण्याचे आश्वासन हाजी युसूफ यांनी दिली आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/472695237513587

Protected Content