जळगाव, प्रतिनिधी । शहरातील मंगलपुरी मेहरुण भागातून बंद घराचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी घरफोडी केली हेाती. भामट्यांनी घरातून २२ हजारांचा टीव्ही चोरून नेल्याची घटना १० जुलै रोजी घडली होती. एमआयडीसी पेालिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद होऊन दाखल गुन्ह्यात पेालिसांनी दोन भामट्यांना अटक केली असून त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
मंगलपुरी मेहरुण येथील रहिवासी महिला काजल साळुंखे या गृहिणीला तिचा भाऊ आकाश ने २२ हजारांचा नवा एलईडी टीव्ही भेट म्हणून दिला होता. मात्र, बऱ्हाणपुर येथे नातेवाइकांकडे लग्नात जात असल्याने १० जुलै रेाजी काजल साळुंखे कुटुंबीयांसह घरबंद करून गावी निघून गेल्या . गावाहून परत आल्यावर त्यांच्या घरात चोरी झाल्याचे आढळून आले. घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले व टीव्ही चोरीला गेला असल्याने तिने भावाला फोन करून सांगितले. आकाश साळुंखे याच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. दाखल गुन्ह्यात निरीक्षक विनायक लोकरे यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसींग पाटील, इम्रान अली सैय्यद, सचिन पाटील, मुद्द्सर काझी, योगेश बारी अशांच्या पथकाने तपास सुरू केला. टीव्ही चोरट्यांची गुप्त माहिती मिळाल्यावरून पेालिस पथकाने दगडू प्रल्हाद शिंदे, गौरव रवींद्र खरे अशा दोघांना नशिराबाद येथून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी चोरीची कबुली दिली असून त्यांना न्यायालयात हजर केल्यावर पेालिस कोठडीत रवानगी करण्यात आली. दोघांनी चेारुन नेलेला टीव्ही नातेवाइकाच्या घरून काढून दिला आहे.