जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरूण तलाव जवळील एका फार्महाऊस जवळ ४५ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी ९ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडल. खून करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीसत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिनेश भिकन पाटील (वय-४५, रा.रामेश्वर कॉलनी) असे मृत प्रौढाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, दिनेश पाटील हे रामेश्वर कॉलनीत पत्नी व मुलगी यांच्यासह वास्तव्याला आहे. एमआयडीसीतील सुप्रिम पाईप कंपनीत ते कामाला आहे. एमआयडीसीतील बहुतेक कंपन्यांना शनीवारी साप्ताहिक सुटी असते. त्यामुळे दिनेश पाटील हे आज सुट्टीवर होते. दरम्यान शनिवारी ९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या जळगाव शहरातील मेहरूण तलावाजवळील डॉ. राजेश जैन यांच्या फार्म हाऊस जवळ असलेल्या एका नाल्याजवळ ते दुचाकी (एमएच १९ बीएक्स १४९७) ने आले. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांचा दगडाने ठेचून खून केला. त्यावेळी दुचाकी आणि मृतदेह यांचे किमान १०० मिटर अंतर होते. दुचाकीजवळ मयत दिनेश पाटील याची चप्पल, दारूची बाटली, पाण्याची बाटली आदी वस्तू आढळून आले आहे. हा खून का करण्यात आला याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंता, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण धनवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, गोविंदा पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. ज्या दगडाने खून केला तो दगड देखील पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.