जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जुने बी.जे.मार्केट पसिरातील मेडॉमॉट या मेडीकल एजन्सीला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना गुरुवार, ११ मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत एजन्सीमधील औषधीचा सामान, सीसीटीव्ही, कॅमेरा, डीव्हीआर, फर्निचर व इतर साहित्य खाक होवून एकूण ३० लाखांचे नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, जळगाव शहरातील गणपती नगर येथील सातपुडा हौसिंग सोसायटी येथे सचिन रमेश मंदाण हे वास्तव्यास आहेत. त्यांची जुने बी जे मार्केट परिसरात मेडॉमॉट नावाने मेडीकल एजन्सी आहे. या एजन्सीला गुरुवार ११ मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटने अचानक आग लागली. यात आगीत औषधीचे सामान, सीसीटीव्ही कॅमेरा, डीव्हीआर, फर्निचर व इतर साहित्य असे साहित्य खाक होवून तब्बल तीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत सचिन मंदाण यांनी दिलेल्या खबरीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक सुवर्णा तायडे हे करीत आहेत.