मेंदूत ब्लॅक फंगस ; लक्षणे शून्य ; तरुणाचा मृत्यू !

 

सूरत:  वृत्तसंस्था । सूरतमध्ये ब्लॅक फंगसची एक विचित्रं केस पाहायला मिळाली     तरुणाला कोणतीही लक्षणं नसताना त्याच्या डोक्यात ब्लॅक फंगस आढळून आला  त्यामुळे अॅटॅक आल्याने या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली सूरतमधील आरोग्य यंत्रणेच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

 

सूरतमधील कोसम्बा येथे हा 23 वर्षीय तरुण राहत होता. या तरुणाला कोरोनाची लागण झाल्याने त्याला 28 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 4 मे रोजी त्याला डिस्चार्जही देण्यात आला होता. मात्र, 8 मे रोजी तो बेशुद्ध पडल्याने त्याच अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला सूरतच्या सिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

 

 

प्राथमिक तपासणीनंतर त्याच्या डोक्यात सूज असल्याचं आढळून आलं. त्यामुळे त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर बायोप्सीसाठी लॅबला सँपल पाठवण्यात आलं. त्यावेळी त्याच्या डोक्यात ब्लॅक फंगस असल्याचं आढळून आलं. त्याला ब्लॅक फंगस असेल असं आम्हाला तोपर्यंत वाटलं नव्हतं. कारण त्याला तशी कोणतीही लक्षणे दिसत नव्हती, असं डॉक्टर मौलिक पटेल यांनी सांगितलं.

 

साधारणपणे तिसऱ्या स्टेजला फंगस डोक्यात जातो. मात्र या रुग्णाला कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसली नाहीत. तरीही त्याच्या डोक्यात फंगस गेला. देशात आतापर्यंत अशाप्रकारची घटना पाहायला मिळाली नाही, असंही डॉक्टरांनी सांगितलं.

 

राज्यात ब्लॅक फंगसच्या केसेस वाढत असतानाच आता हा नवा आणि विचित्र प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सूरतमधील या नव्या केसमुळे हा आजार अधिकच घातक असल्याचं दिसून येत आहे.

Protected Content