मुस्लिम शिष्टमंडळाचे विविध मागण्यांचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अल्पवयीन मुलीची हत्या करणारा साहिल आणि महापुरूषांचा अवमान करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणी जळगाव शहरातील मुस्लिम शिष्टमंडळाच्या वतीने बुधवारी ३१ मे रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांना निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नुकतेच दिल्ली येथे एकतर्फी प्रेमातून दिवसाढवळ्या अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली होती. यातील गुन्हेगार साहिल याच्यावर न्यायालयात जलद खटला चालवून फाशी देण्यासाठी तज्ञ वकीलाची नेमणूक करावी, दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात महापुरुषांचे पुतळ्यांचा ज्या अधिकारी व राजकीय व्यक्तींनी  महापुरुषांचा अवमान केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करावा, आणि इंडिक टेल्स या वेबसाईटवर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत अवमानकारक लेख लिहून प्रसिद्ध केले त्या कंपनीवर, लेखकावर व त्यास प्रोत्साहित करणाऱ्या मास्टरमाईंडवर गुन्हा दाखल करून कारवाई करा. या मागण्यांसाठी बुधवारी ३१ मे रोजी दुपारी १२ वाजता मुस्लिम शिष्टमंडळाच्या वतीने उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी अपर जिल्हा अधिकारी प्रवीण महाजन हे उपस्थित होते. मागणीचे निवेदन देतांना  मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, सैयद चांद, मझहर खान, फीरोज शेख, वसीम खान यांच्यासह आदीची उपस्थिती होती.

Protected Content