चाळीसगाव, प्रतिनिधी | मुलीच्या लग्नासाठी आलेल्या दाम्पत्याच्या घरातील एका बॅगेत ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांसह एकूण ९० हजारांचा ऐवज अज्ञाताने लंपास केल्याची घटना तालुक्यातील लहान बोढरे येथे उघडकीला आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील लहान बोढरे येथील विजय पोपट सोनार हे गवंडीच्या कामानिमित्त विरार मुंबई येथे राहायला आहे. दरम्यान मुलीचा लग्न असल्याने सोनार हे आपल्या कुटुंबासह घरी आलेले होते. लग्नाच्या दिवशी घरात एका बॅगेत ५० हजार किंमतीचे १० ग्रॅम सोन्याची चैन, २४,७५० रूपये किंमतीच्या ५ ग्रॅम सोन्याची अंगठी व १८ हजार रुपये किंमतीच्या साड्या असे एकूण ९२,७५० रूपये किंमतीचा ऐवज ठेवलेले होते. मात्र ते अज्ञाताने चोरून नेल्याची घटना २७ जानेवारी रोजी रात्री ८:३० ते ९ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विजय पोपट सोनार यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.