जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या काळात स्थालांतरित होणाऱ्या परप्रांतियांचा परिस्थितीचा फायदा घेवून तुम्हाला गावापर्यंत सोडून देतो असे सागून मुली व महिलांना हेरून पळूवन नेणाऱ्या संशयित आरोपीचे फोटो जिल्हा पोलीस प्रशासनाने जारी केले असून पकडून देणाऱ्यास योग्य ते बक्षिस दिले जाईल असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशानाने केले आहे.
याबाबत माहिती अशी की, नशीराबाद पोलीस स्टेशनला गुरनं १४७/२०२० प्रमाणे संशयित आरोपी गणेश सखाराम बांगर (वय-३२) मु.पो. मालेगाव वार्ड नं.४ पंचायत समितीजवळ मालेगाव जि. वाशिम वर गुन्हा दाखल आहे. सध्या देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले असल्याने परप्रांतिय हाताला काम नसल्याने मिळेल त्या वाहनाने गावाकडे जात आहे. अशा वेळी पायी जात असलेले मजूरांना हेरून गावी पोहोचविण्यासाठी मदत करतो असे सांगून महिला व मुलींना मोटारसायकलवर बसवून पळवून घेवून जातो. तसेच काही लोकांना हॉटेलमध्ये नोकरीलावून देतो असे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. सध्या आरोपीकडे दुचाकी चोरीची असून कारंजा पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशन जि. वाशिम येथे २०१/२०२० प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्याच्याकडे एमएच ३७ वाय १८४७ क्रमांकाची दुचाकी आहे. दुचाकीवर प्रेस नाव इंग्रजीत लिहीले आहे. सदरील गुन्हेगाराच्या विरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हेगारास पकडून देणाऱ्यास किंवा माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षिस दिले जाईल असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहिती करीता विभागीय पोलीस अधिकारी भुसावळ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.