रावेर, प्रतिनिधी । रावेर पंचायत समितीला जिल्हा परीषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी भेट देऊन विभागनिहाय आढावा बैठक घेतली व यावेळी त्यांनी शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचवीण्याच्या सूचना दिल्यात.
रावेर पंचायत समितीला आढावा बैठक घेण्यासाठी आज जिल्हापरिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी भेट दिली. यावेळी दिव्यांग संघटनानी निवेदन देऊन खोटे प्रमाणपत्र काढणाऱ्या ग्रामसेवकांना निलंबित करण्याची मागणी केली. यावर चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन डॉ. आशिया यांनी दिव्यांग बांधवांना दिले. रावेर पंचायत समितीत विविध विभागनिहाय योजनांचा आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल देखिल उपस्थित होत्या.
https://www.facebook.com/508992935887325/videos/423149162148911