मुख्याध्यापक हेमराज पाटील यांना इंपेरिअल्स शिक्षण महर्षी पुरस्कार प्रदान

जळगाव,प्रतिनिधी । इंपेरिअल्स परिवारातर्फे विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा वाघनगर येथील मुख्याध्यापक हेमराज पाटील यांना इंपेरिअल्स शिक्षण महर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

बुधवार दि.१५ सप्टेंबर रोजी इंपेरिअल्स इंटरनॅशनल स्कूलचे संस्थेचे अध्यक्ष नरेश चौधरी यांच्या हस्ते  मुख्याध्यापक हेमराज पाटील यांना इंपेरिअल्स शिक्षण महर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार समाजातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तिंना दिला जातो. मुख्याध्यापक हेमराज पाटील यांच्या शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि शैक्षणिक कार्य यामुळे इंपेरिअल्स शिक्षण महर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी विवेकानंद प्रतिष्ठान च्या व्यवस्थापन मंडळाकडून विशेष कौतुक करण्यात आले.

 

Protected Content