मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कर्नाटकातील मुस्कटदाबी ही केंद्र सरकारच्या पाठींब्यानेच घडत असून मुख्यमंत्र्यांनी आता तरी भाईगिरी दाखवावी असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आल्याने राज्यातील राजकीय वर्तुळातील वातावरण तापले आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी फोनवरुन संवाद साधला पण त्यांनी फारशी सकारात्मकता दाखविली नाही. या अनुषंकाने खासदार संजय राऊत यांनी जोरदार टिकास्त्र सोडले. तसेच पवारांच्या नेतृत्वात बेळगावला जाणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
या संदर्भात संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रतील वाहनांवर हल्ला केंद्राच्या सांगण्यावरुन झाला. मराठी स्वाभिमान कायमचा संपवण्याचा प्रयत्न होत आहे. एवढं हातबल सरकार आजवर पाहिलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी भाईगिरी दाखवावी. विरोधी पक्षाची मोठी जबाबदारी आहे. कठोर भूमिका घ्या अन्यथा राजीनामा द्या अशा मागणी राऊत यांनी यावेळी केली. तर, शिंदे गटाला निशाणी म्हणून कुलूप दिलं पाहिजे असा टोला देखील त्यांनी मारला.