मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या ७ मार्च रोजी उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत अयोध्येला जाणार असून प्रभू रामचंद्राचं दर्शन घेणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज ट्विटरद्वारे दिली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची सविस्तर माहिती दिली आहे. येत्या ७ मार्च रोजी उद्धव ठाकरे असंख्य शिवसैनिकांसह अयोध्येला जाणार आहेत. ७ मार्च रोजी अयोध्येत दुपारी श्रीरामाचे दर्शन घेतील. त्यानंतर संध्याकाळी शरयू नदीच्या तीरावर महाआरती करतील. त्यामुळे या ऐतिहासिक सोहळ्यात सामील व्हा, असे आवाहनही राऊत यांनी केले आहे.