मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आपल्या समर्थक आमदारांना जैसलमेरला हलवले

जयपूर (वृत्तसंस्था) राजस्थान विधानसभा अधिवेशनाची तारीख निश्चित झाल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आपल्या समर्थक आमदारांना जयपूरहून ५७० किमी दूर जैसलमेरला हलवले आहे. आमदारांचा घोडेबाजार टाळण्यासाठी गेहलोत यांनी हे पाऊल उचल्याचे बोलले जात आहे.

 

 

कॉंग्रेसच्या सर्व आमदारांची व्यवस्था किल्ल्यासारख्या कडेकोट हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. १४ ऑगस्टला विधानसभेचे अधिवेशन सुरू होईपर्यंत ते येथेच थांबतील. अधिवेशनाची तारीख निश्चित झाल्यानंतर आमदारांना खरेदी-विक्रीसाठी फोन येत असल्याचा दावा गहलोत यांनी एक दिवसाआधी केला होता. यामुळे आमदारांचा घोडेबाजार टाळण्यासाठीच त्यांनी आपल्या समर्थक आमदारांना जैसलमेरला हलवले असल्याची चर्चा आहे. दरम्यान, गहलोत कुठपर्यंत पळाल. जैसलमेरच्या पुढे तर पाकिस्तान आहे, असा गंमतीशीर टोला राजस्थान भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी लगावला आहे.

Protected Content