मुक्ताईनगर शहरात खाकीचा धाकच उरला नसल्याने अवैध धंद्यात वाढ

मुक्ताईनगर : प्रतिनिधी | शहरात विविध ठिकाणी भर चौकात व गल्लोगल्ली मटका व पत्त्याचे डाव खुलेआम रंगत असून जुगाराचे अड्डे भर रस्त्यावर भरत असल्यामुळे शाळकरी मुलं याकडे आपोआप ओढल्या जात असल्याचे दिसून येत आहे. यातून खाकीचा धाक उरला नसल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

 

मुक्ताईनगर तालुक्यामध्ये प्रत्येक गावांमध्ये सट्टा, पत्ता जोरात सुरू असून याकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत आहे. मुक्ताईनगर शहरातील प्रमुख चौकांसह परिवर्तन चौका लगतच काही हात गाड्यांमध्ये मटका खेळला जातो, एवढेच नाही तर बस स्टॅन्ड लगत व अगदी तहसील कार्यालय पोलीस स्टेशन जवळील रस्त्यांवरही सट्टा पिढी जोरात सुरू आहे. याकडे पोलिस प्रशासनाचे लक्ष का नसावे असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे. परिवर्तन चौका लगतच असलेल्या दोन रस्त्यांवर्ती असलेले एक बु-हाणपूर रोड व जुन्या गावात असलेले एस. एम. कॉलेज व जे.ई. स्कूल असे दोन विद्यालय असून शाळकरी तरुण मुलं, मुली त्याच रस्त्याने ये-जा करत असतात. त्यांचा बस थांबा हा त्याच रस्त्यावर आहे. त्यांना त्या ठिकाणी वर्दळ असल्याचे दिसून येत असून नेमके त्या ठिकणी काय असा प्रकार बघण्यासाठी जात असतात व ते बघितल्यावर त्या ठिकणी चालू असलेला मटका चा खेळ बघून त्यांचे चिमुकल्यांचे मन मटका खेळण्याकडे भरकटत असून वाईट मार्गाला काही शाळकरी मुलं लागत आहे. तुलसी मेडिकलपासून जो रस्ता एस. एम. कॉलेजकडे जातो त्या रस्त्यावर मटका मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे. त्याच रस्यावर दवाखाने व किराणा दुकान असून लहान मुले किंवा मोठी माणसे, महिला, मुली ये जा करत असतात. त्यांना सुद्धा या बाबतची चीड येत आहे. याला नागरिक खत्री गल्लीच्या नावाने सुद्धा ओळखत आहे अशी नागरिकांत चर्चा आहे. याकडे पोलिस प्रशासन का लक्ष देत नाही? बऱ्याच विविध संघटनांनी चौकामध्ये मर्डर अथवा हाफ मर्डर, हवे मध्ये गोळीबार करणारे भाईगिरी गुंड प्रवृत्तीचे नागरिक समाजामध्ये भीती चे वातावरण निर्माण करणारे काही गुंड प्रवृत्तीचे नागरिक अशा लोकांना आळा बसावा. याच ठिकाणी अवैध धंद्यांचा सुळसुळाट आहे व विशेष म्हणजे ह्याच चौकात नेहमी २ पोलीस कर्मचारी पहारा देत असतांनाही त्यांच्या लक्षात हा प्रकार येऊ नये हे सुद्धा आश्चर्यच असल्याने कॅमेरे बसवले जात नाही ना की यात काही देवाण घेवाण चा आर्थिक व्यवहार चालत आहे. जर असे असेल तर नेमका तो हप्तेखोर व दर महिन्याला लाखोंची वसुली करणारा पोलीस कर्मचारी कोण ? असा प्रश्न मुक्ताईनगरातील सूज्ञ नागरिक उपस्थित करीत आहे.

Protected Content