मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर पोलीस स्टेशन ठाण्यात उविभागीय पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी गावातील मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.
कोरोना: गावबंदीमुळे तळीरामांचा गोंधळ; दारूसाठी मोर्चा वळविला दुसऱ्या गावांकडे
उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी येत्या शनिवारपासून पवित्र रमजान महिन्याची सुरुवात होणार त्या अनुषंगाने मुक्ताईनगर येथील प्रतिष्ठित नागरीक, मौलाना यांचे बैठकीचे आयोजन करण्यात आले त्यात पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी शासनाने लागु केलेल्या नियमांबाबत अवगत करण्यात आले. लॉकडाउन दरम्यान घरातच नमाज पठण करा तसेच तरावीच्या वेळसे गर्दी न करणे, व घराचे छतावर नमाज पठण न करणे अदि सुचना देण्यात आल्या.
लॉकडाऊन काळात यावल तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांची दांडी
याबाबत मौलाना, प्रतिष्ठित नागरीक व मुस्लीम बांधवांनी प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याबाबत अनुकुलता दर्शविली तसेच शासनाचे आदेशाची प्रत ही देण्यात आली. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सचिव आसिफ खान, शिवसेना अल्पसंख्याक संघटक अफसर खान, मनियार बिरादरीचे जिल्हा उपाध्यक्ष हकीम आर चौधरी, नगरसेवक शकील सर, मुशीर मनियार, सुन्नी मस्जिदचे मुतवल्ली कलीम मनियार, शेख हारुन शेख रहीम, सलीम खान सईद खान, जहीर भाई, मौलाना याकुब, मौलाना मुबाशिर रजा अदि उपस्थित होते.