Home Cities जळगाव मुक्ताईनगर येथे भाजपा, शिवसेनेला खिंडार; कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

मुक्ताईनगर येथे भाजपा, शिवसेनेला खिंडार; कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश


जळगाव प्रतिनिधी । राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष व शिवसेना या पक्षातील तरूणांनी मनसेमध्ये प्रवेश केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव ॲड. जमील देशपांडे यांनी नवीन पक्ष ध्वज देऊन त्यांना पक्षाची ध्येय धोरण सांगितली व मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात पक्ष संघटन बळकट करावी, असे आवाहन केले. राज ठाकरे यांनी तूर्त कोरोना व्हायरस बाबत जनतेने काळजी घेण्याबाबत जे आवाहन केले आहे. त्याकरीता पक्ष कार्यकर्त्यांनी काम करावे, या अशी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी संदीप पाटील, संदीप मांडोळे, राजेंद्र निकम हे पदाधिकारी उपस्थित होते. राहूल काळे, ऋषीकेश पाटील यांच्यासह ५० तरूणांनी मनसेत प्रवेश केला आहे.


Protected Content

Play sound