मुक्ताईनगर पंचायत समितीचे असे असेल आरक्षण

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. जाणून घ्या तालुक्यातील सर्व गणांसाठी कसे आरक्षण असेल ते ?

लवकरच पंचायत समितीची निवडणूक होत असून तालुक्यात आठ गण आहेत. काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने आता पंचायत समितीसाठी देखील आरक्षण लागू करण्यात आले असून याच्याच आधारे आज आरक्षण सोडत काढण्यात आली.

 

या आरक्षण सोडतीत तालुक्यातील हरताळे-एस.टी. सर्वसाधारण; उचंदे-एस.टी. महिला;  रूईखेडा-एस. सी. महिला;  निमखेडी-नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण; अंतुर्ली – सर्वसाधारण महिला; कर्की-सर्वसाधारण महिला; कुर्‍हा-सर्वसाधारण आणि वढोदा-सर्वसाधारण असे आरक्षण निघाले आहे.

 

पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर दुपारी जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर होणार आहे. यामुळे आता तालुक्याच्या ग्रामीण भागातील रणधुमाळी खर्‍या अर्थाने सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Protected Content