मुक्ताईनगर नगरपंचायत कार्यालयात वसुली मक्ता संदर्भात जाहीर लिलाव

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर हद्दीतील आठवडे बाजार फी वसूली मक्ता, डेली बाजार वसूली मक्ता आणि वाचनालय रद्दीचा जाहीर लिलावाचे आयोजन २५ मार्च रोजी नगरपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे.

 

मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील सन २०२२ आठवडे बाजार फी वसुलीच्या मक्ता, डेली बाजार फी वसुलीच्या मक्ता व वाचनालय रद्दीचा जाहीर लिलाव शुक्रवार २५ मार्च  मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता नगरपंचायत कार्यालयात आयोजित केलेला आहे. सदर लिलावाच्या अटी व शर्ती नगरपंचायत कार्यालयात कामकाजाच्या दिवशी व कार्यालयीन वेळेत पहावयास मिळतील. आठवडे बाजार फी वसुली मक्ता लीलावाकरीता डिपॉझिट रक्कम रुपये २० हजार,  डेली बाजार करता डिपॉझिट रक्कम रुपये ५ हजार व वाचनालय रद्दी करता डिपॉझिट रक्कम १ हजार रुपये प्रमाणे राहणार आहे. आवश्यक बाबींची पूर्तता केल्याशिवाय लिलावात भाग घेता येणार नाही. यासाठी डिपॉझिट रक्कम भरलेली पावती, आधार मतदान- पॅन कार्ड झेरॉक्स, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स, नगरपंचायत कडील थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र आणि दोन  पासपोर्ट साईज फोटो आणावे असे आवाहन मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

 

Protected Content