मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथील कृषीतंत्र विद्यालयातून ५० हजार रूपये किंमतीचे शेतकरी शाळेचे अवजारे चोरून नेल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीला आला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरापासून जवळ असलेल्या कृषीतंत्री विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कृषी विषयक माहिती देण्यासाठी काही विद्यालयात अवजारे बनिवण्यात येत असतात. यात विद्यार्थ्यांना कृषी अवजारे कशी असतात यांची माहिती देण्यात येत असते. दरम्यान गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या काळात महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते. शुक्रवारी १२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता नेहमीप्रमाणे विद्यालयात आल्यानंतर शाळेचे कर्मचारी विलास दिनकर लवांडे (वय-५२) रा. सुराणा नगर, ता. मुक्ताईनगर यांना शेतकरी शाळेची साफसफाई करत असतांना त्यांनी काही अवजारे चोरून नेल्याचा प्रकार लक्षात आला. त्यांनी मुक्ताईनगर पोलीसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. विलास लवांडे यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास स.फौ.पटवे करीत आहे.