मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी। कर्नाटक राज्यातील उडपी जिल्ह्यात एका शैक्षणिक संस्थांत मुस्लिम विद्यार्थींना हिजाब घालण्यास बंदी घालण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ मुक्ताईनगर मुस्लिम समाज बांधव व भगिनींच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात देशात विविध ठिकाणी सुरु असलेल्या हिजाब विरोध हे नागरीक स्वतंत्राचे उलघन आहे. आमचा देश हा सर्व जाती धर्माचा देश असून संविधान मध्ये सर्वाना आपल्या मर्जीने जीवन जगण्याचा अधिकार आहेत. देशाच्या संविधानात विविध आर्टीकल मध्ये भारतीय नागरिकाला आपल्या धर्म जाती नुसार स्वतंत्र असून जेव्हा देशाची सर्वच स्थानि असलेल्या व्यक्ती आपल्या धर्म जाती नुसार देशाचे सर्वच स्थानी बसुन धर्माचे पालन करु शकतो व देश चालवू शकतो म्हणजे हा देशाचे संविधानने दिलेल्या स्वतंत्र आहे.तर मुस्लीम मुली विद्यार्थीनी फक्त हिजाब घालून शाळेत येऊ शकत नाही.ते हिजाब जे त्यांना उन,प्रदूषण कोरोना सारखे जीवितहानी रोगा पासून व अनेक अडचणी पासून रक्षण करते जे हिजाब ते फक्त स्वतःचे संरक्षण साठी परिधान करते.त्याचा विरोध करने हे महिला वर्गाचा अपमान आहेत,आम्ही आपल्याला या निवेदन द्वारे मागणी करतो की,पुढील हे विषय वर शासनाने लक्ष केंद्रित करून पुढे असे काही होऊ नये व देशाची संस्कृती अभाधित रहावे असे नियोजन देश पातळीवर करावे अशी विनंती करण्यात आली.
यावेळी मशीरा बी. शेखचांद चौधरी, मुस्कान बी, मुबशीरा बी शेख.मकसुद, अलफीया खान, लुकमान बेपारी, शकील सर(नगरसेवक), अफसर खान(शिवसेना अल्पसंख्यांक संघटक), हकीम आर चौधरी (जिल्हा उपाध्यक्ष मनियार बिरादरी)जाफर अली(माजी सरपंच)जुबेर अली, शब्बीर खाटीक, आरीफ आझाद, शकील मेंबर, दाउद टेलर, युनुस खान, समद खाटीक, तौकीर अहेमद, अरबाज खान, तबरेज खान, शाहीद शेख, दानिश खान, आबिद शेख, शकील शाह, हुजैफा खान, अहेमद खान, आसीफ शाह, इमरान बागवान आदी समाज बांधव उपस्थित होते.