मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथील तालुका मुस्लिम मनियार बिरादरीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यानिमित्ताने सरकारी दवाखान्यात रुग्णाना फळ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे जिल्हा सचिव हकीम चौधरी, संभाजी बिग्रेडचे दिनेश शंकरराव कदम, सुन्नी मनियार मस्जिदचे मुत्वली कलिंम हाजी रसूल मनियार, माजी पोलीस पाटील मोहन कौतिक मेढे, ॲड.अनिल पाटील, तायडे, सुन्नी मनियार मस्जिदचे खजिनदार अहेमद ठेकेदार आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अहमद राजीक चौधरी, रेहान चौधरी आदींनी परिश्रम घेतले.