Home Cities मुक्ताईनगरात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

मुक्ताईनगरात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

0
41

मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथील शारदा क्लासेसच्या सन १९९४ मधील दहावीच्या बॅचचा स्नेह मिलन कार्यक्रम कोथळी येथील संत मुक्ताई मंदिर परिसरात नुकताच पार पडला.

सन १९९४ मध्ये शारदा क्लासेसमध्ये शिक्षण घेणार्‍या दहावीच्या विद्यार्थ्यांनी शारदाची स्मार्ट पोरं हा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला. यातून ८० मित्र पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. या ग्रुपवर संदेशांची देवाण-घेवाण होऊन सर्वांनी एकत्र येण्याचे ठरविले. २५ वर्षांनंतर एकत्र आलेल्या या मित्रांच्या या कार्यक्रमास सोहळा मैत्रीचा असे नाव देण्यात आले होते.

कोथळी मंदिरात आयोजित या स्नेह मिलनाच्या प्रारंभी शारदा क्लासेसचे संचालक सुरेश कोळी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व मित्र-मैत्रिणींनी कुटुंबासह आपापला व्यावसायिक परिचय करून दिला. यानंतर डॉ.विक्रांत जैस्वाल, डॉ.जगदीश पाटील व सुरेश कोळी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.निनु झोपे, स्वप्निल धायडे, विनोद परिहार, मनीषा पाटील, आशा कोळी यांनी केले. यानंतर अविनाश नाईक, पुरूषोत्तम वंजारी, मोहन महाजन यांनी गीतगायन केले. या स्नेहमेळाव्यात एकूण ७५ मित्र कुटुंबियांसह सहभागी झाले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound