मुक्ताईनगर प्रतिनिधी । कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी शासनाने संपूर्ण लॉकडाऊन केले आहे. मुक्ताईनगर शहरात असलेल्या गरीब, निराधार, निराश्रीत व दैनंदिन मजुरीवर अवलंबून असलेल्या जनतेचे अन्नाअभावी हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर येथील अन्नदाते यांच्यातर्फे हॉटेल वेदांत गजानन महाराज मंदिरा जवळ अन्नदान वाटप करण्यात येत आहे.
यासाठी प्रवीण पाटिल, बाळा भालशंकर, संजय कपले, परेश जैन, डॉ. सतीश जैन, जितेंद्र लिहेकर श्रीकांत भोजने, सुमीत बोदडे, फकीरा बोरे बुवा, चंद्रमणी इगळे या अन्नदात्यांनी अन्नाची व्यवस्था केलेली आहे.

हे जेवण वाटपाची वेळ सकाळी 12 वाजता आणि सायंकाळी 6 वाजता या दोन वेळात शहातील हॉटेल वेदांत गजानन महाराज मंदिरा जवळ अन्नदान वाटप करण्यात येत आहे. यासाठी धनंजय सापधरे, शुभम तळेले, राहुल सुरपाटणे, राहुल माळी, आशिष भंसाली आणि आचारी भिला वाणी यांचे परिश्रम लाभत आहे.


