मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा मोठा विजय ; भाजपचा धुव्वा

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठा विजय मिळवला असून भाजपाचा धुव्वा उडाला आहे. १८ पैकी १६ संचालकांच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

 

राज्यातील ३०५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची शिखर संस्था असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान पार पडले होते. या निवडणुकीसाठी राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचेच पॅनल तयार करण्यात आले होत. तर त्यांच्याविरोधात भाजपाने उमेदवार दिले होते. परंतू १८ पैकी १६ संचालकांच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

Protected Content