Home राजकीय मुंबईत सुद्धा दंगल घडावी, अशी भाजपची मानसिकता होती ; आव्हाडांचा गंभीर आरोप

मुंबईत सुद्धा दंगल घडावी, अशी भाजपची मानसिकता होती ; आव्हाडांचा गंभीर आरोप


मुंबई (वृत्तसंस्था) या देशाचे राजकारण धर्मद्वेषाच्या माध्यमातून आपल्या ताब्यात ठेवायचे काम भाजप करू पाहतेय, हे दिल्लीच्या दंगलीवरून स्पष्ट होत आहे. म्हणून दिल्लीत ज्याप्रमाणे दंगली घडल्या त्याचप्रमाणे मुंबईत सुद्धा दंगल घडावी, अशी भाजपची मानसिकता होती, असा गंभीर आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागीय कार्यकर्त्या मेळाव्यात ते बोलत होते.

 

दिल्लीच्या दंगलीबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी एकही शब्द न काढणे, म्हणजेचे क्रूरतेची परिसीमा आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जोडी हेच ‘दिल्ली पॅटर्न’ देशभरात चालवणार आहे. मुंबईत सुद्धा दंगल घडावी, अशी भाजपची मानसिकता होती. परंतू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असल्याने भाजपला हे शक्य झालं नसल्याचा गंभीर आरोप आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.


Protected Content

Play sound