मुंबई : वृत्तसंस्था । मुंबईत दररोज सापडणाऱ्यां पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ८५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ही माहिती दिली बुधवारी मुंबईत ११०० पेक्षा जास्त रुग्ण सापडले पण त्यातल्या ८३ टक्के रुग्णांमध्ये कुठलीही लक्षणे नव्हती असे चहल यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या अन्य भागांसह मुंबईतही दररोज रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने वेगवेगळी पावले उचलली आहेत. रुग्णांच्या या वाढत्या संख्येमुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या मनात लॉकडाउनची भिती निर्माण झाली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आली नाही, तर लॉकडाउनचा इशाराही सरकारमधील मंत्र्यांनी दिला आहे.
लक्षणे नसलेल्या रुग्णांना दाखल करुन घेऊ नका, असे पालिका आयुक्तांनी खासगी रुग्णालयांना निर्देश दिले आहेत. राज्यातील ७८ टक्के अॅक्टिव्ह रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहेत, मुंबईत ४९ टक्के अॅक्टिव्ह रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. मागच्या काही आठवड्यातील डाटाचे विश्लेषण केल्यानंतर ७८ ते ८२ टक्के रुग्ण लक्षणे नसलेले आहेत, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकानी म्हणाले. बाहेर फिरताना मास्क न वापरऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यात येत आहेत.