Home क्राईम मुंबईत भोंदूबाबाकडून तरुणीवर बलात्कार

मुंबईत भोंदूबाबाकडून तरुणीवर बलात्कार

2rapecase 56 1


2rapecase 56
 

मुंबई (वृत्तसंस्था) ‘तुझ्या शरीरात एक अपवित्र आत्मा आहे, एखादा शुद्ध पुजारीच हा आत्मा बाहेर काढू शकेल’, असे सांगून एका भोंदूबाबाने तरुण गायिकेवर बलात्कार केल्याचा प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत महिला रिमिक्स अल्बम गायिका आहे. ती चारकोप परिसरात संगीतकार पतीसह भाड्याच्या घरात राहते. तर आरोपी उमेश रमाशंकर पांडे हासुद्धा याच परिसरात राहतो. ‘तुझ्या शरीरात एक अपवित्र आत्मा आहे, एखादा शुद्ध पुजारीच हा आत्मा बाहेर काढू शकेल’, असे सांगून एका भोंदूबाबाने बलात्कार केला. घडलेला प्रकार संशयास्पद वाटल्यामुळे पीडित तरुणीने दुसऱ्या दिवशी आपल्या पतीला ही गोष्ट सांगितली. त्यानंतर दोघांनी चारकोप पोलिसात तक्रार दाखल केली.


Protected Content

Play sound