मुंबईत परतल्यानंतर प्रत्येकाला १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल ; महापालिकेचे आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत येणाऱ्या स्थानिक नागरिकांना परत आल्यानंतर १४ दिवस घरातच राहावे लागणार आहे. मुंबई महानगर पालिकेने हे नवे आदेश काढले आहेत.

 

गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या साथीमुळे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर लोक आपल्या गावी परतले आहेत. आता काही लोक पुन्हा परत येत असल्याने महापालिकेने या गाईड लाईन्स जाहीर केल्या आहेत. मुंबईतल्या रुग्णांची वाढती संख्या आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिकेने म्हटले आहे. ज्या शासकीय अधिकाऱ्यांना मुंबईत आल्यानंतर कामानिमित्त बाहेर पडायचं असेल तर त्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे. कोरोना व्हायरस विरुद्ध खबरदारी म्हणून मुंबईत येणाऱ्या सर्व स्थानिक प्रवाशांना १४ दिवस गृह अलगिकरण करणे अनिवार्य आहे. शासकीय अधिकाऱ्यांना यातून सूट आवश्यक असल्यास amc.projects@mcgm.gov.in वर कामकाजाच्या तपशिलासह दोन दिवस अगोदर अर्ज करणे आवश्यक असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

Protected Content