धरणगाव प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील एका ६० वर्षीय महिलेचा कोरोना व्हायरस रिपोर्ट पॉझेटिव्ह आला होता. या पार्श्वभूमीवर मुंगसे येथून धरणगावात आलेल्या व्यक्तीबाबत माहिती मिळताच लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी हे थेट स्वत: मैदानात उतरले आहेत. त्यांनी संभाजी नगर परीसर त्वरीत स्वच्छ व निर्जंतूकीकरण करून घेतला. एवढेच नव्हे, तर प्रशासकीय पातळीवर तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांच्या संपर्कात आहेत.
धरणगाव येथील संभाजी नगरात राहत असलेल्या एका इसमाची मुंगसे गावाला शेती आहे. शेतीचे कामानिमित्त त्याचे मुंगशी येथे जाणे येणे असते. काल तो मुंगसे नेहमीप्रमाणे शेतीकामासाठी गेला होता असे समजते. तेथील महिलेला कोरोना झाल्याची माहिती त्याने त्याच्याच परिसरात राहणाऱ्या लोकांना गप्पा मारत दिली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी जागृती दाखवत ही माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांना कळवली. त्यांनी तात्काळ तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधला. त्यानंतर त्या व्यक्तीची धरणगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक तपासणी करण्यात आली. तरी देखील पुढील काळजी म्हणून त्याला जळगाव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. दुसरीकडे कोरोनाबाबत दक्षता घेत नगराध्यक्ष श्री. चौधरी यांनी थेट स्वत: मैदानात उतरले. नगराध्यक्ष निलेश चौधरी यांना या विषयाची तत्काळ दखल घेत नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना संभाजी नगर परीसरात तातडीने स्वच्छ व निजर्तुंकीकरणाच्या सुचना दिल्या. दरम्यान नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी स्वत: त्या परीसरात उपस्थित राहून दीड ते दोन तासात संपुर्ण परीसर स्वच्छ करून घेतला. नगराध्यक्ष श्री. चौधरी यांनी पोलीस यंत्रणा, प्रशासनाशी चर्चा योग्य त्या सूचना देखील केल्या आहेत. तर पालिका विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोडीअम हायपोक्लोराईडची फवारणी केली. नगराध्यक्ष निलेश चौधरी हे संपुर्ण परिस्थीतीवर लक्ष ठेवून आहेत.