मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या दसरा मेळाव्यात त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली. भाषणाला सुरूवात करताच विरोधकांवर हल्ला चढवला. मुख्यमंत्री म्हणून मी तुम्हाला कधी वाटू नये, मी तुमच्या घरातलाच आहे. हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला हाणला. काही जण मी पुन्हा येणार म्हणून गेले, ते आता बसले आहेत असाही चिमटा त्यांनी काढला.
आजच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपवर कडाडून टीका केली. शिवसेना पक्ष म्हणून आपला आवाज कोणी दाबू शकत नाही, कोणीही जन्माला आलेला नाही. शस्त्रपूजन केल्यावर खऱ्या शस्त्रांवर फुले उधळली हेच प्रेम प्रत्येक जन्मी मिळो हीच माझी प्रार्थना आहे. माझा कुटूंब माझा परिवार हीच शस्त्रे बाळासाहेबांनी दिली आहेत. मी मुख्यमंत्री आहे, हे कधीही वाटू नये. मी तुमच्या घरातला आहे हे वाटो, ही इश्वर चरणी प्रार्थना आहे. जे बोलत होते, मी पुन्हा येईन म्हणणारे ते आता बसले आहेत. जे संस्कार, संस्कृती बाळासाहेबांनी दिले, मा साहेबांनी दिले. पदे काय आहेत, पदे येतील जातील, सरकार असेल पुन्हा येईल आणि जाईलही पुन्हा येईल. मी कुणीतरी आहे, अहमपणा जायला हवा. ज्या क्षणी हवा जाईल, तेव्हा जनता स्विकारेल. म्हणूनच मी जनतेशी नम्रतेने वागतो. कारण आशीर्वाद हीच आमची ताकद आहे, हेच वैभव आहे.
ठाकरे कुटूंबावर हल्ला करणे काहींचे कामच झाले आहे. पण ठाकरे कुटूंबावर हल्ला करणारा जन्माला आलेला नाही. ठाकरे कुटूंबावर हल्ले करायचे, हे रोजगारी हमीचे काम काही जणांचे झाले आहे. किती पैसा तुम्हाला मिळतो आहे, की तुम्ही चिरकत रहा. पण माझा वाडा चिरेबंदी वेगळ्या प्रकाराने प्रयत्न केला तरीही भेदता येणार नाही. ठाकरे कुटूंबावर हल्ला करणारा अजून जन्माला आलेले नाहीत.
ही काय लायकीची माणसं आहेत, ते आपल्या अंगावर येत आहेत. आव्हान देत आहेत, हिंमत असेल तर अंगावर या. मी कशाला येऊ तुमच्या अंगावर? आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही. पण कुणी आलं तर आम्ही सोडत नाही. आम्ही कशाला येऊ तुमच्या अंगावर? काय आहे तसं? लायकी तरी आहे का, पात्रता तरी आहे का? हीच शिकवण आम्हाला शिवरायांनी, शिवसेना प्रमुखांनी दिली आहे. पण अंगावर यायची भाषा करत असाल तर स्वत: मध्ये हिंमत आणि धमक असेल तर द्या. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून देऊ नका. मी सुद्धा पक्षप्रमुख म्हणून आज आव्हान द्यायतं असेल तर माझ्या या मर्द शिवसैनिकांच्या माध्यमातून आणि त्यांच्या ताकदवर देईन. मुख्यमंत्री म्हणून देणार नाही. आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपायचं, याला नामार्द म्हणतात.
आज दोन मेळावे असतात. एक आपला आणि दुसरा आरएसएसचा. आपले विचार एक आहेत. पण धारा वेगळ्या असू शकतात. विचार एक होत्या, आहेत म्हणूनच भाजपसोबत युती केली होती. ज्यांना अजूनही वाटतं ते मुख्यमंत्री राहिले असते, कदाचित राहिले असते. जर तुम्ही शिवसेनेला दिलेलं वचन मोडलं नसतं तर तुम्हीसुद्धा आज नाहीतर उद्या मुख्यमंत्री राहिले असता. पण नशिबात नव्हतं म्हणून तुम्ही वचन तोडलंत. मी हे पद स्वीकारलं ते एका जबाबदारीने स्वीकारलं. मी केवळ माझ्या पित्याला दिलेलं वचन म्हणून मी हे पद स्वीकारलं. शिवेसेना प्रमुखांना दिलेलं वचन, तुमचा शिवसैनिक मी मुख्यमंत्री करुन दाखवेल, खरंतर ते वचन अजून पूर्ण झालेलं नाही. पण ते वचन मी पूर्ण करुन दाखवेलंच. ही जबाबदारी मी मोठ्या विचाराने घेतलेली आहे. कदाचित दिलेलं वचन त्यांनी पाळलं असतं शिवसैनिक मुख्यमंत्री केली असती तर मी या राजकीय जीवनातून बाजूला झालो असतो. हे क्षेत्र माझं नाही, अशी माझ्यावर टीका होते. हो हे माझं क्षेत्र नाही. मी एक पूत्र कर्तव्य निभावण्यासाठी या क्षेत्रात आलो आहे. आणि पाय रोवून ठाम पणाने उभा राहिलो आहे. जी जबाबदारी खांद्यावर आहे ती ठामपणे पार पाडल्याशिवाय राहणार नाही, या जबाबदारीने मी उभा राहिलेलो आहे.
एक मुद्दा मी स्पष्ट करु इच्छितो, आमचं हिंदूत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. शिवसेनाप्रमुखांनी अनेकवेळा सांगितलं आहे, पहिल्यांदा आपण माणूस म्हणून जन्माला येतो. जात-पात, धर्म हा नंतर चिकटतो. मग काय करायच? धर्माचा अभिमान असला पाहिजे. धर्म पाळला पाहिजे. पण प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवायचा, घराबाहेर पाऊल टाकतो हा माझा देश हा धर्म असलाच पाहिजे, हे आमचं हिंदुत्व आहे. हा विचार आमचा आहे. ही शिकवण आम्हाला दिलेली आहे. अशी शिकवण घेऊन आम्ही जेव्हा घराबाहेर पडतो, देश हा धर्म असं म्हणून वाटचाल करत असतो त्यावेळेला आमच्या वाटेत स्वत:च्या धर्माची मस्ती घेऊन कोणी अडथळा आणला तर मग आम्ही कडवट देशाअभिमानी, राष्ट्राभिमानी हिंदू म्हणून त्याच्यासोबत उभं राहिल्याशिवाय राहणार नाही.
उध्दव ठाकरे म्हणाले की, अंगावर आल्यानंतर शिंगावर घेण्याची भाषा करणार असाल तर स्वत:मध्ये हिंमत आणि धमक असेल तर आणि तर द्या. ईडी, सीबीआय, इनकम टॅक्सच्या माध्यमातून देऊ नका. मी सुद्धा पक्षप्रमुख म्हणून आव्हान द्यायचे झाल्यास माझ्या मर्द शिवसैनिकांच्या माध्यमातून आणि त्याच्या ताकदीतून देईन. मुख्यमंत्री म्हणून देणार नाही.
९२-९३ साली जेव्हा पूर्ण मुंबई पेटली होती, इतरही ठिकाणी दंगली झाल्या तेव्हा कोण रस्त्यावर उतरले होते ? कोणी जबाबदारी घेतली होती? बाबरी पाडली तेव्हा आज जे लोकं छाती पुढे करुन पुढे येत आहेत तेव्हा ते त्यांच्या शेपट्या त्या शेपट्या आहेत की नाही एवढ्या आत कापत बिळात लपले होते. थरथरत होते. बोलायची कुणाची हिंमत नव्हती. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, गर्व से कहो हम हिंदू है. तेव्हाही मुंबई वाचवली होती ती पोलिसांच्या मदतीने नाही. गुजरातच्या मुंद्रा पोर्टवरही ड्रग्ज सापडले त्यावर का नाही बोलत, महाराष्ट्रातच ड्रग्ज सापडत आहेत असं नाही, मग महाराष्ट्राशी नतद्रष्टपणा का? मोदी सरकार केंद्रात आल्यानंतर गुजरातला सर्वाधिक निधी, महाराष्ट्र मात्र जनतेच्या पैशाने कोरोनाची लढाई लढतोय.
उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्वाच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर घणाघात केला आहे. तसेच गांधी-सावरकर यांच्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या वक्तव्याचाही चांगलाच समाचार घेतला आहे. सावरकर-गांधी यांच्यावर केलेल्या विधानामुळे राज्यात एकच खळबळ माजली होती. यावर सावरकर, गांधी उच्चारण्या इतकी आपली लायकी आहे का? असा खोचक सावल केला आहे. तसेच हिंदूत्वाच्या मुद्द्यावरुन सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही निशाणा साधला आहे. दंगलीच्या वेळी शेपटी आत घालून बसलेले आता छाती थोपवत पुढे येत आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.