मिस्टर इंडिया मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई   : मिस्टर इंडिया मनोज पाटील याने आत्महत्येचा प्रयत्न केला असून बॉलिवूड अभिनेता साहिल खान  याच्या त्रासाला कंटाळून मनोज पाटीलने हे पाऊल उचलल्याचे त्याच्या सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

 

 

मनोज पाटीलने २०१६ मध्ये मिस्टर इंडिया मेन्स फिजिक ओव्हरऑल चॅम्पियनशिप  हा किताब पटकावला होता. याच  मनोज पाटीलने गोळ्या घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काल रात्री मनोज पाटीलने आत्महत्या करत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मनोज पाटीलने अभिनेता साहिल खान आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावरही व्हिडीओ शेअर करत हे आरोप केले होते. त्रास आणि बदनामीमुळेच आपण आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं मनोज पाटीलने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

 

मिस्टर इंडिया राहिलेला मनोज पाटील मिस्टर ऑलिम्पियासाठी प्रयत्न करत होता. साहिल खानलाही या स्पर्धेत उतरायचं होतं. यामुळेच साहिल खान आपण स्पर्धेत सहभागी होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचा मनोज पाटीलचा आरोप आहे. याशिवाय व्यावसायिक तसंच इतर वादही होते. याशिवाय साहिल खान सोशल मीडियावर आपली बदनामी करत होता असंही मनोज पाटीने म्हटलं आहे. या सर्व गोष्टींमुळे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.

Protected Content