मुंबई: वृत्तसंस्था| कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं जाहीर केलेल्या ‘मिशन बिगीन अगेन’ची नियमावली आता 31 जानेवारी 2021 पर्यंत कायम ठेवण्यात आली आहे. राज्य शासनानं याबाबत आदेशही जारी केले आहेत.
महाराष्ट्र सरकारने कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनचे निर्बंध 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडून गर्दी न करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. सरकारने या संदर्भात सर्कुलर जारी करुन घरातच राहून नववर्षाचं स्वागत करावं. समुद्रकिनारे, उद्याने तसंच रस्त्यावर जाऊ नये असं म्हटलं आहे.
सर्कुलरमध्ये विशेषत: दहा वर्षांखालील मुलं आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वृद्धांनी कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.
दरम्यान, 31 डिसेंबरच्या रात्री हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब्ज रात्री 11 वाजेपर्यंतच खुली ठेवण्याची परवानगी आहे. 11 वाजल्यानंतर हॉटेल्स, रेस्टॉरंट इत्यादी ठिकाणी नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे.
आपत्कालीन सर्व नियमावली आधीच्या लागू राहतील, असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, 31 डिसेंबर नववर्ष स्वागत सर्वांनी केले पाहिजे. पण रात्री 11 नंतर हाॅटेल्स पब्स बंद राहील. मरीन ड्राईव्ह गेट वे ऑफ इंडिया येथे गर्दी करू नये, चार पेक्षा जास्त लोक एकत्रित आले तर कारवाई केली जाईल, असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.