मिळालेल्या संधीचे सोने करा – प्रा.डॉ. अनिल पाटील

yaval news 1

यावल, प्रतिनिधी | आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात अनेक संधी तुमच्या समोर येतात. तुम्हाला पुढे जाऊन तिचा स्वीकार करायचा असतो. असे शिक्षण घ्या की, जे जगात तुमची वेगळी ओळख निर्माण करेल. असे मत साकेगाव येथील मॅनेजमेंट महाविद्यालयातील प्रा.डॉ. अनिल पाटील यांनी यावल महाविद्यालयातील करिअर मार्गदर्शन व समुपदेशन समितीच्या वतीने आयोजित ‘स्पर्धा परीक्षा व एम.बी.ए.प्रवेश प्रक्रिया’ या विषयावर बोलताना व्यक्त केले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे होत्या. त्यांनी म्हटले की, जगात ज्ञानाच्या अनेक वाटा असतात. कोणती वाट निवडायची, हे आपल्या हातात असते. एकदा वाट निवडल्यावर मात्र निरंतरपणे पुढे जात राहा. तुमची जिद्द तुम्हाला पुढे घेऊन जाईल.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एस.पी. कापडे यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांनी मानले. कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा.ए.पी.पाटील, उपप्राचार्य प्रा.संजय पाटील, डॉ.सुधा खराटे, प्रा.एस.आर. गायकवाड, प्रा.ए.एस.अहिरराव यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Protected Content