जळगाव प्रतिनिधी । माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता सह एकावर वाळू व्यावसायिकांकडून १ लाख ७० हजार रूपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वाळू व्यवसायिक विठ्ठल भागवत पाटील (वय-३२) रा. ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी व शहरातील काही लोक बिल्डींग मटेरियल सप्लायर्ससाठी वाळू वाहतूकीचा व्यवसाय करतात. नियमानुसार शासकीय चलन भरून हा व्यवसाय करतो. कोरोनामुळे लॉकडाऊन काळात वाळू वाहतूकीचे सर्व व्यवसाय बंद आहेत. सामाजिक कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता व अनिस पांडे यांनी मिळून २९ एप्रिल २०२० रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास गुप्ता यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बोलावून घेतले. गुप्ता म्हणाले की, “मी तुला सांगितले होते की, तुझ्या व तुझ्या सोबत असलेल्या लोकांच्या व्यवसायाबाबत सांगितले होते, माझे काम केले नाही” असे बोलून सागर पार्कजवळ विठ्ठल पाटील आणि बाळे नामदेव चाटे असे गेले असता, गुप्ता यांनी शिवीगाळ व दादागीरी करून “तुम्हाला जळगावात राहू देणार नाही, तुमच्या विरूध्द महितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवून खोटे गुन्हे दाखल करून तुला जेलमध्ये टाकेल” असा दम दिला. त्यानंतर बाळू चाटे यांच्यासमोर दिड लाख रूपये रोख दिले. त्यावर गुप्ता म्हणाले की, मला दर महिन्याला हप्ता तुम्ही लोकांनी द्यायचा आहे. पुन्हा मे महिन्यात मनपाजवळी खाऊ गल्ली येवून पुन्हा पैश्यांची मागणी केली त्यावेळी राहूल ठाकरे यांच्या समोर वीस हजार रूपये दिले. त्यानंतर १६ जून रोजी पुन्हा पैश्यांची मागणी केली. १९ जून रोजी गुप्ता यांचा सहकारी अनिस पांडे यांने सकाळी १० वाजता कोर्ट चौकात बोलावून गुप्ता व तुमचा वाद मिटवतो असे सांगितले. शुक्रवारी सायंकाळी विठ्ठल पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता व अनिस पांडे यांच्याविरोधात १ लाख ७० हजार रूपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.