सुरत : वृत्तसंस्था । गुजरातमधील सुरत येथील पोलीस हवालदाराने ३३ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. मास्क न घालता फिरत असल्याच्या कारणावरुन या हवालदाराने पीडित महिलेला ताब्यात घेतलं होतं.
सुरत येथील उमरपाडा पोलीस स्थानकामध्ये हा हवालदार कार्यरत आहे. मास्क घातलं नाही म्हणून कठोर कारवाई करेन अशी धमकी देत हवालदार मला त्याच्यासोबत पलसाना येथे घेऊन गेल्याचा आरोप या महिलेने केलाय. त्यानंतर या हवालदाराने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर पुढे अनेक महिने तो माझ्यावर वारंवार बलात्कार करायचा, असा आरोप या महिलेने केलाय. एकीकडे या महिलेने बलात्काराचा हवालदारावर बलात्काराचा आरोप केलेला असतानाच दुसरीकडे या हवालदाराच्या पत्नीने पीडित महिला जातीवरुन आरोप करत असल्याचा दावा केलाय.
ज्या पोलीस कर्मचाऱ्यावर आरोप करण्यात आलेत त्याचं नाव नरेश कपाडिया असं आहे. नरेश यांच्या पत्नीने मात्र पीडित महिला आणि तिचा पती आमच्या घरी आले होते आणि त्यांनी आम्हाला जातीवाचक अपशब्द वापरत गोंधळ घातल्याचा आरोप केलाय. पीडितेने गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस हवालदाराच्या पत्नीनेही या महिलेविरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पीडितेविरोधातही मागास वर्गातील व्यक्तींला शिविगाळ केल्याच्या गुन्हाखाली तक्रार दाखल करुन घेतलीय. प्राथमिक तपासामध्ये आरोप करण्यात आलेल्या हवालदार आधी पलसाना पोलीस स्थानकामध्ये कार्यरत असल्याची माहिती मिळालीय. जानेवारी महिन्यामध्ये नरेश आणि पीडित महिला वाद घालत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची बदली उमरपाडा येथे करण्यात आली
२०२० च्या लॉकडाउनदरम्यान पलसाना येथे राहणारी ही पीडित महिला दूध आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्यावेळीच या पोलीस हवालदाराने मास्क न घातल्याचं कारण देत या महिलेला हटकलं आणि तिला कारवाई करण्याची धमकी देत तिला ताब्यात घेतलं. या महिलेला पोलीस स्थानकात नेण्याऐवजी तो तिला नवसारी रोड येथील निर्जनस्थळी घेऊन गेला. ‘तिथे हवालदाराने माझे कपडे फाडले मला माहरण केली,’ असा आरोप महिलेने केलाय. यावेळी हवालदाराने माझे नको त्या अवस्थेत फोटो काढले आणि माझ्यावर बलात्कार केल्याचंही या महिलेने म्हटलं आहे.
आरोपीने नंतर या फोटोंचा वापर करुन महिलेला छळण्यास सुरुवात केली. नंतरही या हवालदाराने अनेकदा आपल्यावर बलात्कार केल्याचं या महिलेने तक्रारीत नमूद केल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिली. मात्र याच अधिकाऱ्याने पोलीस हवालदार आणि या महिलेचे प्रेमसंबंध असल्याची शंकाही बोलून दाखवली आहे. दोघांमध्ये वाद झाल्याने त्यांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केल्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केलीय.