पाळधी प्रतिनिधी । विधीमंडळाच्या नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री आमदार गुलाबराव पाटील यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशा मागणीचा पाठपुरावा केला.
यासंदर्भात तसेच कर्जमाफी योजनेला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव देऊन शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत ची कर्जमाफी केल्याबद्दल पाळधी येथील सकल फुले प्रेमी तथा माळी समाज बांधवांच्या वतीने माजी सहकार राज्यमंत्री आमदार. गुलाबराव पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदर मागणी गुलाबराव पाटील यांनी दोन वर्षांपूर्वीच केली होती त्या मागणीचा पाठपुरावा त्यांनी यावेळी हिवाळी अधिवेशनात केला. यावेळी माळी साम्राज्य चे प्रमुख भूषण महाजन, सरपंच चंदू माळी,पत्रकार गोपाळराव सोनवणे, साई वेअर हाऊस चे सुरज झंवर, युवासेनेचे आबा माळी, अनिल माळी, दिगंबर माळी, राजू माळी,यासह मोठ्या प्रमाणावर फुले प्रेमी व माळी समाज बांधव उपस्थित होते.